आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासननामा:अधिकाऱ्यांकडून काम करताना सर्जनशीलतेचा अधिक वापर गरजेचा - ज्‍येष्ठ साहित्यिक भारत सासणे

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयात समस्‍या घेऊन येणाऱ्या सर्व सामान्‍य माणसांचे दुःख समजावून घेऊन त्‍याला केंद्र बिंदु मानून अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे. प्रशासनात काम करतांना सर्जनशीलतेचा अधिक वापर केला पाहिज, असे मत 95व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष तथा माजी सनदी अधिकारी भारत सासणे यांनी सोमवारी व्यक्त केले.

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त जिल्‍हा मराठी भाषा समितीच्‍या वतीने 95व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे यांच्‍या सत्‍कार समारंभाचे व संवाद कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगरच्या जिल्‍हाधिकारी कार्यालयात करण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते बोलत होते. जिल्‍हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, ज्‍येष्‍ठ साहित्यिक संजय कळमकर, उपनिवासी जिल्‍हाधिकारी संदिप निचित, किशोर मरकड आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी जिल्‍हा प्रशासनाच्या वतीने भारत सासणे यांचा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सत्‍कार केला. सासणे यावेळी म्‍हणाले, लेखक वेगळा आणि अधिकारी वेगळा असतो असा समज समाजामध्‍ये पहावयास मिळतो. जो अधिकारी आहे तो लेखक होऊ शकतो व जो लेखक आहेत अधिकारी होऊ शकतो. मी सुध्‍दा प्रशासनात काम केले असून , साहित्‍य क्षेत्रात लेखक म्हणून काम करत आहे. कामाच्‍या ठिकाणी परिसर व वातावरण चांगले असल्‍यास अधिक कल्‍पकतेने काम करता येते, असे काम केल्‍याने निश्चितच समाधान प्राप्‍त होते. सर्व सामान्‍यांचे शासकीय काम जर वेळेत पूर्ण झाले तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघुन सुध्‍दा आपणास समाधान मिळते, असे ते म्हणाले. आपल्‍या प्रत्‍येकात सर्जनशीलता आहे. त्‍याचा वापर कार्यालयातील कामात प्रभावीपणे केल्‍यास समाधानाबरोबर आनंदही मिळतो, असे त्‍यांनी सांगितले.

पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तके देणार

जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्‍हणाले, नागरीकांकडून येणारे प्रत्‍येक निवेदन वाचली पाहिजेत व त्‍या निवेदनात असलेल्‍या त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रत्‍येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्‍न करावा. अधिकारी व कर्मचारी यांनी वेळात वेळ काढुन विविध साहित्‍याचे वाचन सुध्‍दा केले पाहिजे. जिल्‍हाधिकारी कार्यालयात यापुढे कोणत्‍याही कार्यक्रमात पुष्‍पगुच्‍छे देण्‍याऐवजी पुस्‍तके देऊन सन्‍मान करण्‍याची प्रथा सुरू करण्‍याचा संकल्‍प करुया. त्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात सुसज्‍ज ग्रंथालय सुरू करू या ग्रंथालयासाठी पुस्‍तके खरेदी केली जातील, असे त्‍यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...