आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आगामी काळातही विविध उपक्रम राबवू

पाथर्डी शहर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेशोत्सवाचा आनंद नागरिकांना वर्षभर लुटता यावा यासाठी शहराच्या मध्यवर्ती नवी पेठ येथे श्री गणेशाच्या मंदिराची उभारणी करून शहराच्या वैभवात भर घातली आहे. तसेच श्री गणेशाची सुमारे २५ किलो वजनाचे चांदीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. आगामी काळातही विविध प्रकारचे उपक्रम राबवून या माध्यमातून शहरवासीयांच्या सेवेत राहू, असे प्रतिपादन ट्रस्टचे नुतन अध्यक्ष संतोष भागवत यांनी केले.

नवीपेठ येथील सुवर्णयुग परिवार ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संत नरहरी महाराज मंदिर येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष भागवत यांची, तर उपाध्यक्ष बाळासाहेब शहाणे, सचिव संजय चिंतामणी,खजिनदार सुनील भांगे, प्रसिद्धी प्रमुख नितीन गटाणी, सल्लागार म्हणून माजी अध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, सोनू गुगळे, अशोक गर्जे, संजय दराडे, आनंद फासे, मधुकर मानुरकर, राम चिंतामणी, बाळासाहेब मानुरकर, पांडुरंग शिळवणे, सुनील मानुरकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

सुवर्णयुग परिवार गणेशोत्सवासह सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आदी क्षेत्रातही योगदान देत आहे. यापूर्वी नगर परिषदेच्या स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्टिकर छपाई व इतर साहित्यासाठी ८० हजार रुपये ट्रस्टने दिले होते. यावेळी अशोक नांदेवालीकर,मोदक मानूरकर, सागर दराडे, पुरुषोत्तम पंडित, वैभव मानूरकर, महेश पंडित, कृष्णा वेदपाठक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...