आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षासाठी महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे मत अहमदनगरमध्ये युती झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी प्रसार माध्यमांची बोलताना व्यक्त केला.ते म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये लवकरच पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गट आणि शिंदे गट मेळावाचे आयोजन करून पक्ष बळकटीसाठी रणनीती ठरवणार आहे.
जाहीर मेळाव्याचे आयोजन केले जाणार असून लवकरच स्थानिक दोन्ही पक्षाच्या नेत्याची एक बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरविण्यात येईल. पक्षाचे प्रदेश सहप्रवक्ते जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे, सोमा शिंदे, महेश भोसले, गौतमी भिंगरदिवे, विशाल गायकवाड, किरण गायकवाड, किरण जाधव, नितीन साळवे आदी प्रमुख कार्यकर्त्यांंनी या युतीबद्दल समाधान व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.