आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहटा देवस्थान समितीने धार्मिक व निसर्ग पर्यटन क्षेत्रात विशेष विकास कामे करून राज्याच्या पर्यटन विषयक लौकिकात भर घालावी. देवीचे शक्तीपीठ समजून या स्थानाच्या सर्वांगीण विकास साधण्यास सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली.
राज्य शासनाने वनविभागाची सुमारे दहा एकर जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरित करण्यास संमती दिली असून त्याबदल्यात अकोले शिवारातील देवस्थानकडून मिळणाऱ्या जमिनीची स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांनी देवस्थान समितीला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत विश्वस्त सुधीर लांडगे (नगर) होते. मोहटा देवस्थानच्या विकास कामांबाबत डॉ. भोसले यांनी विशेष लक्ष घातले असून याबाबत विश्वस्त, भाविक व प्रशासनातील विशेषता वनविभाग, जिल्हा परिषदे बरोबर संवाद साधत लोकांची मागणी जाणून घेत देवस्थान समितीला त्यांनी सूचना केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांच्याकडून जागा हस्तांतरणाबाबत माहिती घेऊन येत्या मंगळवारी याबाबतची शासकीय नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले.
त्यानंतर पत्रकारांनी डॉ. भोसले यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सुमारे सात वर्षांपूर्वी देवस्थान समितीने अतिक्रमणे हटवून रिकाम्या झालेल्या वनविभागाच्या जागेसाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर केला. सुमारे चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने या प्रस्तावास विशिष्ट शर्ती व अटी घालून मान्यता दिली. त्यामधील खर्चाची रक्कम कमी व्हावी म्हणून देवस्थान समितीने अपील केले. ते मान्य होऊन दोन कोटीहून अधिक रुपये खर्चाच्या कामाची सुट मिळाली. काटेरी कुंपण घालून जागा देण्याबाबत धर्मदाय खात्याने मंजुरी दिली. राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर जागेची पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.