आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रोफेसर कॉलनी चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारू; आमदार जगताप यांचे प्रतिपादन, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती उत्साहात

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. लवकरच नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज व्यापारी संकुलाचे काम मार्गी लावू व त्या आवारामध्ये धर्मवीर संभाजीराजांचा भव्य-दिव्य पुतळा उभारू. यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, उदय अनभुले, सतीश इंगळे, जलअभियंता परिमल निकम, इंजिनियर सुनील जाधव, ॲड. अनुराधा येवले, सचिन जगताप, राहुल साबळे, ॲड. मंगेश सोले आदी यावेळी उपस्थित होते.

सुरेश इथापे म्हणाले, धर्मवीर संभाजीराजे हे शूरवीर राजे होते. त्यांची ख्याती सातासमुद्रापार पसरली होती. धर्मवीर म्हणून त्यांची ओळख होती.

बातम्या आणखी आहेत...