आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे येथील मुंबादेवी परिसर हा नदीकाठी असल्याने तो सुंदर व निसर्गरम्य असा आहे. सर्वांची साथ असेल तर मुंबादेवी परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देऊ, अशी ग्वाही मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासे येथील कहार समाज बांधवांसह भाविकांचे श्रद्धास्थान मुंबादेवी मंदिर परिसर विकास कामासाठी एक कोटी सात लाखांची तरतूद करण्यात आली अाहे. परिसर विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी मंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत विकासकामापासून दुर्लक्षित झालेल्या मुंबादेवी मंदिर परिसराला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडाख यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री गडाख म्हणाले, आतापर्यंत ४० कोटींच्या उपलब्ध निधीतून नेवासे शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला आहे. ज्या रस्त्यावरून कोणाला चालताही येत नव्हते, असे दर्जेदार रस्ते नेवासे शहरात तयार झालेले आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. शहर विकास कामांसाठी आणखी ४० कोटी रुपये कामांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मार्केट कमिटी परिसरात असलेल्या दोन एकर जागेत लवकरच भव्य दोन कोटी खर्चाचे उद्यान उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुंबादेवी या पवित्र स्थानाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्यासाठी मला सर्व बांधवांची खंबीर साथीची गरज आहे अशी साद घालत मंत्री गडाख यांनी मुंबादेवी मंदिराची नोंद उताऱ्याच्या रूपाने घेण्यासाठी मुख्याधिकारी यांना आदेश दिले. आतापर्यंत ४० कोटींचा निधी दिला अजून चाळीस कोटी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे त्यास ही लवकरच मंजुरी मिळेल असे सांगत मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आजच दहा कोटी रुपये मंजूर झाले, असे मंत्री गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबादेवी मंदिराचे मार्गदर्शक महंत बृहस्पतीनाथ महाराज, समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे,अॅड. काका गायके, मुंबादेवी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संतोष पडूंरे, रामभाऊ जगताप, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप उपस्थित हाेते. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाघ यांनी, तर अाभार संतोष पडूंरे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.