आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न लाभार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा असून येत्या महिन्याभरात याबाबत तोडगा काढून अनुदान उपलब्ध होण्याबाबत मार्ग काढू, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहावर घरकुल संघटनेच्या सदस्यांनी खासदार डॉ. विखे यांची भेट घेऊन निवेदन देत व्यथा मांडल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक माजी नगरसेवक रामनाथ बंग म्हणाले, पालिकेने २१३ पात्र लाभार्थ्यांना सुमारे चार वर्षांपूर्वी घरकुल मंजूर केले. सर्वांनी राहते घर पाडून नवीन घर बांधण्यास प्रारंभ केला.
पालीखेड़ा पहिला हफ्ता मिळालेल्या रकमेतून काम सुरू झाले. पुढे मात्र चौथा व पाचवा हफ्ता प्रलंबित राहिल्याने कामे अपूर्ण राहून राहण्या योग्य घरे झाली नसल्याने स्थलांतरित यासारखे जीवन जगण्याची लाभार्थ्यांना वेळ आली. गेल्या तीन वर्षांपासून अनेक वेळा आंदोलने झाली, निवेदने दिली. पण आश्वासनाशिवाय काही पदरी पडले नाही.
भाड्याच्या घरात राहून हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्यांच्या आर्थिक भार आता असहाय होत आहे. सर्वच लाभार्थी मोलमजुरी करणारे दारिद्र्य रेषेखालील आहेत. दुसरा व तिसरा हफ्ता सुद्धा वारंवार मागणी करून मिळाल्याने बांधकाम खर्चात सुद्धा वाढ झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ नेते अर्जुन शिरसाट, अॅड. प्रतीक खेडकर, अजय रक्ताटे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर याबरोबरच संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय इजारे, राजेंद्र उदारे, एकनाथ भंडारी, सलीम शेख, अलका डोमकावळे, सुलताना शेख, गणेश राऊत आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, पूर्वीच्या थकीत हप्त्याबाबत आपणच पाठपुरावा केला होता. चौथा व पाचवा हप्ता मिळण्यासाठी संबंधितांशी बोलून विषय मार्गी लावू, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.