आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांची पाठराखण:भाजप कार्यकर्त्यांमागे भक्कमपणे उभे राहू, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

नेवासे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यामागे भक्कमपणे उभे राहू व नेवासे तालुक्यात मोठे काम उभे करू, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी औरंगाबादवरून पुणे जाताना शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचे दर्शन घेऊन महाआरती केली. नेवासे तालुका भाजपच्या वतीने नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शहराध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक सुनील वाघ, सरपंच विष्णू गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, दिलीपराव पवार, देविदास साळुंखे, तुळशीराम झगरे, अण्णा पाटील गव्हाणे, येडूभाऊ सोनवणे, रविकांत शेळके, कल्याणराव मते, बाळासाहेब क्षीरसागर, आदिनाथ पटारे, दत्तात्रय लांघे, अशोक टेकने, आनंद बुधेकर, डॉ. बाळासाहेब कोलते आदी उपस्थित होते. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे यांच्या बाभूळवेढा येथे वस्तीवर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.