आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:जखणगाव ग्राम प्रकल्पाला सहकार्य करू ; डॉ. सांगळे

नगर तालुकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जखणगांव ता. नगर एक चळवळीचे गांव आहे. गेल्या २०वर्षापासुन गावात आरोग्य ग्राम संकल्पनेतून माणसं, जनावरे, पक्षी,शेत जमीन, वातावरण व पाणी यांचे आरोग्य सुधारावे व अबाधित रहावे म्हणुन सर्व ग्रामस्थ गट ,तट ,पक्ष ,पंथ बाजूला ठेवून तनमनधनाने अटोकाट प्रयत्न करत आहेत.आरोग्यग्राम प्रकल्पाला गती मिळावी म्हणून आरोग्यविभाग आणि प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दिले.

जखणगांवचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच डाँ. सुनिल गंधे यांनी नुकतीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली व त्यांना आरोग्य ग्राम प्रकल्पाचा आराखडा सादर केला. डाँ. सांगळे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावेळी मनोहर काळे, तात्या कर्डिले, शिवाजी कर्डीले यांचे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...