आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार अंमलबावणीबाबत कार्यवाही करू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३२ कोटींच्या जागा खरेदीबाबत संपूर्ण शहरातून विरोधाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीनेही आयुक्त पंकज जावळे यांनी या विषयावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सावेडी उपनगरात खासगी ४ एकर जागेवर स्मशानभूमी व दफनभूमीचे आरक्षण प्रस्तावित करून ती संपादित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. नगररचना विभागाने या जागेचे सुमारे १६ कोटी रुपये मूल्यांकन काढत ती शासन निर्देशानुसार दुप्पट दराने म्हणजेच ३२ कोटी रुपयांना घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते. महापौरांनी सभागृहात रुलिंग देताना ऑफिस रिपोर्ट मंजूर केल्याचे सांगितले. या विषयाला विरोध सुरू झाल्यानंतर महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही, या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले आहे.

यासंदर्भात आयुक्त जावळे यांनी प्रशासनाच्या वतीने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ठराव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. अद्याप महासभेचा ठराव प्रशासनाकडे सादर झालेला नाही. त्यामुळे महासभेकडून काय ठराव दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...