आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबैलगाडी शर्यतीला ही इतर खेळाप्रमाणे राज्य शासनाकडून पाठबळ मिळावे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज्याच्या पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिले.
कर्जत-जामखेड एकात्मिक सोसायटीच्या वतीने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री आदिती तटकरे यांची होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. ऊर्जा व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष आशुतोष काळे, बैलगाडी शर्यतीचे आयोजक तथा आमदार रोहीत पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप बनकर, आमदार अशोक पवार, आमदार संजय शिंदे, आमदार अनिल पाटील, आमदार यशवंत माने, आमदार अशोक काळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार निशांत सिद्दीकी, आमदार इंद्रनिल नाईक उपस्थित होते.
राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे अत्यंत अवघड काम असते. या शर्यतीत बैलांना तसेच प्रसंगी माणसांना ही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना महाराष्ट्रात या शर्यतीचे यशस्वी आयोजन होत आहे. यात आयोजक व शेतकरी यांचे कौशल्य आहे.
राज्यमंत्री, आमदारांनी घेतला बैलगाडी शर्यतीचा आनंद
राज्यमंत्र्यांनी व आमदारांनी बैलगाडी शर्यतीच्या चुरशीच्या लढतीचा आनंद घेतला. तत्पूर्वी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे सीना नदीवरील घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण कामांचा भुमिपूजन राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.