आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन कर्जसुविधा:सोसायटयांमार्फत इलेक्ट्रीक वाहन कर्जसुविधा देण्यासाठी प्रयत्न करू ; कोल्हे यांचे आश्वासन

कोपरगाव शहर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे. जगाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू आहे. प्रवासासाठी इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने बाजारात येऊ लागली आहेत. ग्रामीण अर्थकारणात मोलाचा सहभाग देणाऱ्या सहकारी सोसायट्या शेती कर्ज वितरित करीत आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा व्हावा, अशी मागणी असंख्य सभासद शेतकऱ्यांनी केली असून त्याबाबत कर्ज पुरवठा करून त्यातुन उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकेल काय, असा पर्याय समोर येत अाहे. भविष्यात त्यादृष्टिने जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील ब्राम्हणगाव परिसरातील नवनिर्वाचित सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शुक्रवारी लक्ष्मीबाई मंगल कार्यालय येसगाव येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी भाजपचे तालुका सरचिटणीस दीपक चौधरी यांनी प्रास्तविक केले.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक साहेबराव कदम, निवृत्ती बनकर, विश्वास महाले, वेणुनाथ बोळीज आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...