आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:आमदार पाचपुते यांच्याच नेतृत्वाखाली समाजकारण व राजकारणात काम करू; साजन पाचपुते यांची माहिती

श्रीगोंदे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते आमचे चुलते हे आमच्यासाठी एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील आम्ही सर्व सदस्य असुन आमच्या कुटुंबात गावातील काहीजन विघ्नसंतोषी लोक भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करित आहे.परंतु आम्ही सर्वजणा एकच आहोत या पुढील काळात चुलते आमदार पाचपुते यांच्याच नेतृत्वाखाली समाजकारण व राजकारणात काम करणार असल्याचे भाजपचे युवा नेते साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

काष्टी येथे शनिवारी साजन पाचपुते यांनी त्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. साजन पाचपुते म्हणाले, तालुक्यात अनेक विरोधक जाहिर सांगतात आमदार पाचपुते हे आजारी असतात म्हणून फिरत नाही. जनतेला वेळ देत नाही. लोकांचे प्रश्न सोडवित नाही. म्हणून आता त्यांची पार्टी संपली आहे. हा विरोधकांचा गोड गैरसमज आहे, असे पाचपुते यांनी सांगत आमदार बबनराव पाचपुते व वडील जिल्हा परिषद सदस्य स्व.सदाशिव पाचपुते हे आमच्या कुटुंबातील दैवत आहेत. त्याच प्रमाणे आम्ही आगामी काळात आमदार पाचपुते यांच्या मनातील त्याचे आवडते नाव देवून स्व.सदाअण्णा पाचपुते यांच्या नावाने सेवाभावी संस्था तयार करुन त्याच माध्यमातून तालुक्यात एकशे एक मुलींचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक काम हाती घेणार आहे.

स्व.सदाअण्णांच्या जाण्याने गेली दीड वर्षात आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातून अद्याप आम्ही त्यातून सावरलो नाही. त्यामुळे तालुक्यात अनेकांना वाटले. आमच्या कुटुंबात व आमदार पाचपुते यांच्यात मतभेद आहेत, अशी चर्चा रंगवली गेली. शेवटी प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात, पण आमच्या कुटुंबातील मतभेदाची चर्चा करुन आम्ही वेगळे होणार नाही. घरात आमच्या अनेक गोष्टी एकत्र आहेत आणि त्या राहतील पण तुम्ही त्याची चर्चा करुन आमच्या साठी वाईट होऊ नका.

स्व.सदाअण्णा यांनी राजकारणात व समाजकारणात बबनदादांच्या मागे खंभीरपणे उभे राहून साथ दिली. याची प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून तर चाळीस वर्षे सामान्य जनतेनी आमच्या कुटुंबात सत्ता दिली. त्याच सत्तेच्या माध्यमातून आम्ही समाजाचे देणे लागतो. यासाठी सत्ता असो वा नसो कायम जनतेच्या प्रश्नासासाठी काम करत राहून प्रश्न सोडवणार. तालुक्यात अनेकांनी आमच्या कुटुंबातील चर्चा बाहेर रंगवून घरात मतभेत दाखवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करुन तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याच प्रयत्न करत आहेत.पण विरोधकांचा तो प्रयोग यशस्वी होऊ देणार नाही, असेही पाचपुते म्हणाले.

आगामी काळात आमची ताकद दाखवून देवू
आमच्या कुटुंबात कौटुंबिक कलह आहे हे बबनदादांचे कार्यकर्ते कधी सांगत नाहीत, पण विरोधक चर्चा करतात व आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांनी थांबवावा आम्ही एकच आहोत आणि राहणार. त्यामुळे माझे त्यांना आव्हान आहे. आमची पार्टी संपलेली नाही. आगामी काळात सर्वाना बरोबर घेऊन आमची ताकद दाखवून देऊ, असे साजन पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...