आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:कॅन्सरबद्दल जनजागृती करून आठवडाभर महिलांची तपासणी

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धकाधकीच्या जीवनात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना, स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका महिलेवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. या युगात जिच्या हाती आरोग्याची दोरी, ती जग उध्दारी.. असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. ममता नंदनवार यांनी केले.

महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. नंदनवार बोलत होत्या. यावेँळी डॉ. सारिका झरेकर, डॉ. दत्तात्रय अन्दुरे, डॉ. तेजश्री जुनागडे, डॉ. विनोद गाडेकर, गीता देशमुख, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार विपुल शहा, सचिव सुनील छाजेड आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. नंदनवार म्हणाल्या, सोशल मिडीयामुळे युवती कमी वयातच गरोदर होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला डॉक्टरांनी आरोग्यासह या बाजूने देखील युवतींचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. शिबीराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. मीरा बडवे यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा-मुलगी मध्ये समानता निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...