आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

शेवगाव शहर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच इयत्ता अकरावी मध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विलासजी पुजारी साहेब,प्राचार्य संजय चेमटे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका रूपा खेडकर,प्रा अशोक तमनर उपस्थित होते.

इयत्ता अकरावीला नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाकडून पेन, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून प्रा. अशोक तमनर यांनी व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कोमल वखरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रूपा खेडकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पोटभरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...