आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार राम शिंदे यांचा जामखेड तालुक्यातील पिंपरखेड, हाळगाव, आरणगाव, जामखेड येथे सत्कार करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी जामखेड शहरात मिरवणूक काढण्यात आली. विश्रामगृहापासून ते बीड रोडपर्यत भाजपचे झेंडे, अनेक ठिकाणी कमानी होत्या.
या मिरवणुकीसाठी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा उपाध्यक्ष आजिनाथ हजारे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शरद कार्ले, सरचिटणीस प्रवीण चोरडिया, अल्ताफ शेख, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, रविंद्र सुरवसे, गोरख घनवट, माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, महारुद्र महारनवर, सरपंच बापूसाहेब ढवळे, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सरपंच लहू शिंदे, अभिजित राळेभात, शिवकुमार डोंगरे, उद्धव हुलगुंडे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, ॲड. प्रविण सानप, कांतीलाल खिंवसरा, सुभाष जायभाय, सोमनाथ पाचरणे, वैजिनाथ पाटील, मकरंद काशीद, सुनील यादव, अनिल लोखंडे, ईश्वर मुरुमकर, बाजीराव गोपाळघरे, नितीन धनवटे, प्रवीण बोलभट, विष्णू गंभीरे, राहुल राऊत, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. गणेश जगताप आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.