आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पंचायत समितीत गुलाबपुष्प देत स्वागत; पाथर्डी पंचायत समिती कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाकडून अनोखे आंदोलन

पाथर्डी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने मागील काही दिवसांपूर्वी पाच दिवसांचा आठवडा केला. तेव्हा शासकीय कार्यालयीन वेळेत देखील बदल केले आहेत. शासनाने कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी केलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पाथर्डी पंचायत समितीमध्ये सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचारी हे वेळेत कार्यालयामध्ये न येता उशिरा म्हणजे आपल्या सोयीनुसार कार्यालयामध्ये येत होते. आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्ते मिळून पाथर्डी पंचायत समितीचे मुख्य गेटवर गांधीगिरी आंदोलन केले. त्यामध्ये सकाळी ९.४५ वाजता मुख्य गेटवर उपस्थित राहून उशिरा येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

जवळपास १०.३० मिनिटांचे आसपास सुमारे पंधरा ते वीस कर्मचारी आधिकारी उशीरा आले. त्या सर्वच कर्मचारी आधिकारी यांना गुलाब पुष्प दिले, तर अनेक अधिकारी व कर्मचारी हे गेटवर आम्ही उभे आहोत, हे पाहून पळून गेले. अनेक कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयामध्ये आलेच नाहीत. यावेळी उशिराने आलेल्या एका कर्मचाऱ्याने, तर आम्हा आंदोलकांना अरेरावीची भाषा वापरून धमकी दिली. त्याबाबत आम्ही उशिरा आलेल्या व अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, यासाठी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी देखील सविस्तर माहिती घेऊन उशिरा येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना नोटीस पाठवून खुलासा घेऊ, असे आश्वासन दिले. कामचुकार कर्मचारी व अधिकारी यांचेमुळे जनतेच्या प्रश्नासाठी हे कार्यालय उदासीन आहेत.

पाथर्डी पंचायत समितीचे अनेक कर्मचारी व अधिकारी हे स्थानिक आहेत. त्यामळे मित्रमंडळी सोबत सातत्याने बाहेर हॉटेलमध्ये व आपल्या आपल्या घरी जेवण करण्यासाठी जाणे अशा प्रकारे या पंचायत समितीचे कारभार चालू आहे. तेव्हा यामध्ये आज सुधारणा करावी, यासाठी आम्ही आज गांधीगिरी आंदोलन केले, असे किसन आव्हाड म्हणाले. आंदोलनामध्ये गोरक्ष ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते भास्करराव दराडे, सोमनाथ बोरुडे, राजेंद्र दगडखैर यांनी सहभाग घेतला.

सर्व कार्यालयात आंदोलन करू
यापुढे देखील आम्ही सर्वच शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे गांधीगिरी आंदोलन करणार आहोत. एकीकडे शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी बायोमॅट्रिक हजेरी (थम) सिस्टीम आणली. मात्र, यालाही अधिकारी व कर्मचारी जुमनायाला तयार नाहीत. आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था या प्रशासनाची झाली. यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही, असे आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...