आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठ्यपुस्तक वाटप:सावेडी येथील श्रीसमर्थ प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचे तुतारीच्या निनादात स्वागत ; मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वितरण

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडीतील श्रीसमर्थ प्रशालेच्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळातील दोन वर्षांनंतर प्रथमच आकर्षक कमानी, रांगोळ्या, कार्टूनचा सहभाग, भव्य दिव्य तुतारीच्या जयघोषात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेमध्ये करण्यात आले.

विद्यार्थ्याचे स्वागत करण्यासाठी संस्थेचे सचिव डी. आर. कुलकर्णी, शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर कार्यकारिणी सदस्य विकास सोनटक्के, श्रीपाद कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या माजी प्राचार्य संध्या कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार उपस्थित होते. स्वागताचा क्षण हा आला, या स्वागत गिताने विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे स्वागत वर्षा खणकर यांनी स्वागत गीतातून केले. कल्याण मुरकुटे यांनी अभंग सादर केला व हषर्द भावे यांनी तबल्यावर साथ दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी व पालकांचे स्वागत व त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मंथन प्रज्ञाशोध व प्राथमिक शिक्षक महासंघ आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे यादी वाचन रघुनाथ चांदेकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक भेटवस्तू देऊन मान्यवरांनी केले. डी. आर. कुलकर्णी व सुरेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्कूल चले हम, श्रीगणेश वंदना या गाण्यावर नृत्य सादर केले. गणेश पारधे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...