आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाचे स्वागत:जिप्सीतर्फे नटराज पूजन करून नववर्षाचे स्वागत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत आमदार संग्राम जगताप यांचे हस्ते डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, जेष्ठ नाटककार सदानंद भणगे, अभिनेते मोहिनीराज गटणे, श्रेणीक शिंगवी, अध्यक्ष शशिकांत नजान, अनंत रिसे, युवा दिग्दर्शक स्वप्नील नजान यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली सभागृह येथे नटराज पूजन करून करण्यात आले. आमदार जगताप म्हणाले, समाजात घडणाऱ्या घटनांची नोंद रंगभूमी घेत असते. चांगल्या प्रथा रुजवणे, वाईट घटनांविरोधात आवाज उठवणे, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती करण्याचे काम रंगभूमी करते.

अहमदनगरचे कला विश्व अतिशय प्रभावी असून सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकजन आपल्या पद्धतीने करीत असतात. पण जिप्सी प्रतिष्ठान नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत ही प्रथा आपल्या शहराची ओळख झाली आहे. शशिकांत नजान म्हणाले, १९९७ ला सुरू झालेली जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

बातम्या आणखी आहेत...