आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३१ डिसेंबर रोजी २०२२ या सरत्या वर्षाला निरोप आणि २०२३ च्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी हजारो लिटर मद्याच्या बाटल्या रित्या झाल्या, मात्र खंडाळा येथील युवकांनी दूध वाटप करून एक आदर्श उभा केला आहे. ३१ डिसेंबर म्हटलं की सर्व तरुण वर्ग अनेक ठिकाणी नववर्षाचा आनंद साजरा करताना दिसेल व आनंद आनंदात व्यसनाधीन होताना आपल्याला अनेक वेळा बघायला मिळाले असेल. पण खंडाळा गावातील तरुणांनी ३१ डिसेंबर रोजी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. तरुणांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दूध वाटप करण्यात आले.कोणताही आनंद साजरा करताना व्यसन केले जाते मात्र व्यसनमुक्त राहूनही आनंद साजरा करता येतो. सर्व तरुण पिढीला व्यसनापासून दूर करायचं व त्यांना शारीरिक तंदुरुस्त राहण्याकरीता दूध व इतर गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. याबद्दल जनजागृतीही करण्यात आली. यावेळी खंडाळा गावातील बहुसंख्येने तरुण उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.