आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये द्या:अकोल्यात काँग्रेसच्या वतीने उपोषण व धरणे आंदोलन

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले. हे या सरकारला माहीत असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघ्याची भूमिका घेत आहेत. या सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात येत नाही. याबरोबरच महाविकास सरकारकडून मंजूर विकास कामांवरील तरतुदीस स्थगिती देण्यात आली.

राजकीय द्वेषातून अकोले तालुक्यातील मंजूर विकास कामांना स्थगिती दिली. गुरुवारी (3 नोव्हेंबर) अकोले तहसील कार्यालयासमोरील काँग्रेसच्या लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलनात याचा जाहीर निषेध करण्यात आला.

आंदोलनास जाहीर पाठिंबा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून विकास कामांना स्थगिती देण्यात आली, ती राजकीय आकसातून व अन्यायकारक आहे. ती स्थगिती तत्काळ उठवावी व मंजूर विकास कामे सुरू करावीत. अतिवृष्टीत राज्यातील शेतकरी व शेती संकटात आली असून पुरती उद्ध्वस्त झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व सरकारने आठ अ नुसार शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयांचे एकरी अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी अकोले तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी धरणे आंदोलनात उपस्थित होऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

यांची उपस्थिती

या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे, पाटीलबा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी नेहे, तालुका सचिव संपत कानवडे, सोन्याबापू वाकचौरे, रमेश जगताप, शंकरराव वाळुंज, मदन आंबरे, अॅड. के. बी. हांडे, भास्कर दराडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, संभाजी वाकचौरे, रजनीकांत भांगरे, साईनाथ नवले, दशरथ जाधव, रामदास धुमाळ, रमेश जगताप, सुजित नवले, रामदास शेटे, माजी सरपंच सुमनबाई जाधव, शंकर गोर्डे, सचिन जगताप, बाळासाहेब गोर्डे, शिवाजी आरोटे, सुरेश नवले, सखाराम खतोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन शिवाजी नेहे यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ के. बी. हांडे यांनी केले.

पदयात्रेत सहभागी व्हा

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, अगस्तीचे संचालक पाटीलबा सावंत, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, भास्कर दराडे यांची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील खराब झालेल्या खरीप पिकांना सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीवर शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेत भाषणे केली. तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी आंदोलनातील मागण्यांचा पुनर्रउच्चार करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेत सहभागी होण्यासाठी अकोल्यातून तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन तहसीलदार सतीश धिटे यांनी स्वीकारले.

बातम्या आणखी आहेत...