आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न:नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकून काय साध्य केले ; शुभांगी पोटे यांचा नगरसेवकांना सवाल

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसाधारण सभेत शासनाकडून प्राप्त निधीवर चर्चा तसेच इतर विकास कामाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेवर २० पैकी १६ नगरसेवकांनी बहिष्कार टाकुन काय साध्य केले असा सवाल नगराध्यक्षा शुभांगी पोटे व माजी नगराध्यक्ष नगरसेवक मनोहर पोटे यांनी केला आहे.

पोटे दाम्पत्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, चार वर्षे स्वपक्षीय तसेच विरोधी नगरसेवकांनी काम चांगले असल्यानेच कधी विरोध केला नाही. पण राज्यात सत्तांतर होताच १६ नगरसेवकांनी विरोधात भूमिका घेतली. ती लढाई नगरपरिषद बाहेर चालू आहे. पण नागरिकांच्या व शहर विकास बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली. त्याला गैरहजर राहून त्यांना शहर विकास ऐवजी राजकारणात रस जास्त असल्याचे दिसून येते अशी टीका केली आहे.

या सभेत प्राप्त निधीवर चर्चा होणे गरजेचे कारण वेळेत निधी खर्च झाला नाही. तर निधी परत जाण्याची भीती असते म्हणून या सभेला सर्वांनी हजर राहणे गरजेचे होते पण ते का गैरहजर राहिले सवाल करून पोटे म्हणाले केवळ शहर विकास हेच ध्येय ठेऊन आम्ही २०१६ पासून काम केले बदलते शहर हा त्याचा पुरावा आहे. कोविड काळात देखील विकास निधी मिळवून कामे केली. आमचे नेतृत्व शहराला मान्य आहे. विरोधक आम्हाला वेगळ्या पद्धतीने पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पोटे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...