आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ग्रामीण विकासाचे कामकाज करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तब्बल १४ हजार २२८ कर्मचारी संपावर गेल्याने दिवसभर कामकाज ठप्प राहिले. केवळ वरिष्ठ अधिकारीच कार्यालयात होते. एखाद्या कर्मचाऱ्याने कामावर जाण्याचा प्रयत्न केला, तर गद्दार, गद्दार अशा घोषणाही दिल्या जात होत्या. कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोबाइल क्रमांकही गद्दार नावाने सेव्ह करण्याचे आवाहन यावेळी आंदोलकांनी केले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी मंगळवारी सकाळीच जिल्हा परिषदेसमोर जमले होते, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशा टोप्या घालून जोरदार घोषणाबाजी कार्यात आली. जिल्हा परिदेय प्रवेशद्वारासमोरच निदर्शने झाली. त्यानंतर वाहनतळ आवारात मंडप उभारून त्यात ठाण मांडले होते. मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषद मुख्यालयात ३७८ कर्मचारी असून ४९ रजेवर आहेत, ३१ जणांनी काम केले, तर २९७ जण संपात सहभागी झाले. ग्रामीण भागातील १५ ह जार ६१५ कर्मचाऱ्यांपैकी २६९ रजेवर होते, तर कार्यालयात १ हजार ११८ जणांनी काम केले. संपात १४ हजार २२८ कर्मचारी सहभागी झाले.
संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावणार
दहावी व बारावीच्या परीक्षेचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली आहे. त्यामुळे आजचा पेपर होऊ शकला आहे. जे कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यांना आम्ही नोटिसा बजावणार आहोत. आशीष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी.
ही कामे झाले ठप्प
प्रशासनात मार्चअखेरची लगबग सुरू असल्याने बिले मंजुरी, विकासकामांवर खर्च करणे यासह तांत्रिक कामे सुरू आहेत. तसेच २०२३-२०२४ चे वार्षीक अंदाजपत्रक तयार करण्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. अशातच कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासकीय सर्वच कामे तूर्तास थांबली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.