आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभागाची कारवाई:वाळूचोरी करताना घोगरगाव शिवारात गोदा काठावरही सापडली यांत्रिक बोट

कुकाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यात घोगरगाव शिवारात वाळूतस्करीशी संबंधित गोदावरी नदी काठावर पाच लाख रुपये किंमतीची वाळू उपशासाठी वापरली जाणारी यांत्रिक बोट यंत्रासह व लोखंडी पाईपसह शुक्रवारी महसूल यंत्रणेने पकडून कारवाई केली. याप्रकरणी अज्ञात बोट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्र्यांच्या दाैऱ्यानंतर नेवाशात वाळुतस्करी व गौण खनिज बेकायदा उत्खननप्रकरणी महसूल यंत्रणेकडून दररोज कारवाई सुरू आहे.

याप्रकरणी तलाठी रामेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नेवासे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशाने शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घोगरगाव जुने गावठाणचे शेजारी गोदावरी नदीकाठच्या महादेव मंदिराजवळ वाळू उपशासाठी असलेली एक बोट बंद अवस्थेत आढळली. मंडलाधिकारी तृप्ती साळवे यांच्या उपस्थितीत या बोटीचा पंचनामा करण्यात आला. वाळू उत्खनन करण्यासाठी ही बोट वापरली जाते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात तलाठी गाडेकर यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला. महसूलमंत्री विखे यांच्या दोऱ्यातही अशाच यांत्रिक बोटी आढळल्याने काल मंडलाधिकारी व प्रवरासंगमच्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गुरुवारी याच भागात गौण खनिज उत्खनन विरोधी भरारी पथकास हुलकावणी देण्यासाठी मुरुमाची वाहतुक करणाऱ्या डंपरने रोडवरच मुरूम खाली करुन मंडलाधिकारी यांच्या पथकाच्या डोळ्यात धुळफेक करत डंपर व कोतवालाचा मोबाइल पळवल्याची फिर्याद महिला तलाठ्याने दाखल केली. त्यानंतर आज बोट पकडण्यात आली. महसुलमंत्री विखे यांच्या दोऱ्यानंतर तालुक्यातील महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. महसूल विभागाकडून कारवाईचे सत्र सुरूच

बातम्या आणखी आहेत...