आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडे बोल सुनावले:पालकांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये भवितव्य दिसते याला जबाबदार कोण; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा सवाल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांची किरकोळ शुल्क पालक देत नाहीत, मात्र कोचिंग क्लासचे लाखभर रुपयांचे शुल्क देण्यास तयार होतात. कारण पालकाला कोचिंग क्लासमध्ये मुलांचे भवितव्य दिसते. याला कोण जबाबदार आहे ? शाळा महाविद्यालयात सर्व सुविधा असतानाही दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे आपले अपयश आहे, असे खडे बोल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे सुनावले.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६१ वे शैक्षणिक अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार जयंत आसगावकर, जे. के. पाटील, शांताराम पोखरकर, सुनील पंडीत, शिवाजीराव काकडे, प्रा. भानुदास बेरड शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वसंत लोढा आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३५ वर्षांनी नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. जगाच्या पाठीवर डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारले जात आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
महासंघाच्या अधिवेशनाच्या व्यासपिठावरून सीईटीच्या फायदे तोट्यावर विचार मंथन होऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मागण्या व अधिकारासाठी आंदोलने होत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात काहीही गैर नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असेही, विखे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...