आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन साजरा:का. ल. शिंदेंच्या जीवनकार्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा; तांबे

राहाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक का. ल. शिंदे यांनी राहात्यात शैक्षणिक संकुल सुरू करून सामान्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये थोर स्वातंत्र्यसैनिक शिंदे यांची पुण्यतिथी व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक प्राचार्य इंद्राभान डांगे होते. याप्रसंगी उद्योजक नरेश राऊत, फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोरडे, ‘गणेश’चे माजी चेअरमन नारायण कार्स कमिटी सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे, रयत संस्थेचे समन्वय सदस्य कारभारी आगवान,माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ,साहेबराव निधाने आदी उपस्थित होते.

प्राचार्य डांगे म्हणाले, मला घडवणारे बरेच गुरुजन आज हयात नाही. तरीही सर्व गुरुजनांना मी वंदन करतो. जेव्हा राहत्याचा इतिहास लिहिला जाईल. त्यावेळी थोर स्वातंत्र्यसैनिक शिंदे यांनी उभारलेल्या शारदा संकुलाशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही गुरूंचे स्थान आयुष्यात सर्वात मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी गणेशचे संचालक मोहनराव सदाफळ,सुहास वाबळे, शिंदे कुटुंबीयांतर्फे मंगला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शारदा संकुलाचे प्राचार्य संजय तरटे यांनी केले. याप्रसंगी डॉ. पी. जी. गुंजाळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक सर्जेराव मते, प्रभाताई दंडवते, प्राचार्य राजेंद्र बर्डे, गणेशचे संचालक भाऊसाहेब चौधरी, सुरेश शिंदे, कन्या विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे,प्राचार्य निशा चेंगोटे,प्राध्यापक प्रमोद तोरणे, प्राध्यापक शरद गमे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रमेश आहेर व राजेंद्र पठारे यांनी, तर आभार रमेश शिंदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...