आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पत्नीची आत्महत्या, पती विरूद्ध गुन्हा दाखल; अकस्मात मृत्यूची नोंद

अकोले25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुझ्या आई वडिलांकडून २ लाख रूपये घेऊन आली तरच तुला मी नांदवीन. पैसे नाही आणले तर मी घरातून हाकलून देईन व दुसरीशी लग्न करेल, अशी धमकी पत्नीस देवून मानसिक व शारीरीक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती बाळासाहेब वाकचाैरे, रा. रुंभोडी याच्याविरूद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रुंभोडी येथील शितल बाळासाहेब वाकचौरे (वय ३५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्मला हरिश्चंद्र रोकडे हल्ली रा. अण्णा भाऊ साठे नगर, वाबळे इस्टेट, ठाणे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, १ मे २०१० ते ३ जून २०२२ पर्यत फिर्यादीची मुलगी शितल वाकचाैरे ही तिच्या सासरच्या राहत्या घरात नांदत असताना पती बाळासाहेब वाकचौरे याने तू तुझ्या आई वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये, तरच मी तुला नोंदवून. तू पैसे नाही आणले तर तुला घरातून हाकलून देईल, असे सांगून तिला मारहाण व शिवीगाळ करीत असत. तसेच तू पैसे नाही आणले तर मी दुस-या महीले बरोबर लग्न करेन, अशी धमकी देवून तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केले. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...