आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्जत तालुक्यात राशीन येथील श्रीराम हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. महेंद्र थोरात (४६) यांनी शनिवारी पहाटे पत्नी वर्षा (३९), मुलगा कृष्णा (१६) व कैवल्य (७) यांना इंजेक्शन देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला स्टेलटेपने डायरीच्या कागदावर त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
राशीनसह परिसरात ही घटना समजताच त्यांच्या हॉस्पिटलसमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. राशीन शहर दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या आत्महत्येबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
समाजात अपराध्यासारखे वाटते : आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने िलहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘माझा थोरला मुलगा कृष्णा (१६) याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दुःख आम्ही आई-वडील म्हणून सहन करू शकत नाही. म्हणून मी माझी पत्नी वर्षा नाइलाजास्तव आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. यात कोणालाही जबाबदार धरू नये.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.