आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिंगार छावणी परिषदेची निवडणूक ही निवडणूक आपण सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. सातही प्रभागात उमेदवार निवडून आणू. भिंगार शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन कामे करावी, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. भिंगार छावणी परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.
३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. या बैठकित आमदार जगताप यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, कलीम शेख, संभाजी भिंगारदिवे, नाथाभाऊ राऊत, विशाल बेलपवार, कैलास मोहिते, जेव्हीअर भिंगारदिवे, मुस्सा सय्यद, सुरेश मेहतानी, मतीन ठाकरे, मळू औटी, सुदाम गांधले, संतोष जाधव, संजय खताडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.