आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : काळे

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडून आल्यापासून मागील अडीच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणला आहे. श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून मतदार संघाच्या विकासाचा श्री गणेशा केला. त्यामुळे देवस्थानास निधी मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्र जरी राज्यात सत्ताबद्दल झाला असला तरी श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, केलेल्या पाठपुराव्यातून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अजूनही विकास कामांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. येत्या काही दिवसात त्या विकासकामांना देखील मंजुरी मिळणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. श्री मयुरेश्वर देवस्थानास क वर्ग दर्जा मिळवून देवून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार काळे यांचे यावेळी आभार मानले.

यावेळी अशोकराव रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, प्रविण शिंदे, माजी संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, संजय रोहमारे, रोहिदास होन, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वैशाली आभाळे, संदीप रोहमारे, बाबासाहेब रोहमारे, नंदकिशोर औताडे, मधुकर औताडे, किसन पाडेकर, हरिभाऊ जावळे, रविंद्र वर्पे, विजय रोहमारे, योगेश औताडे, सुनील वर्पे, अनिल वर्पे, विठ्ठल जावळे, नितीन शिंदे, शिवाजी होन, आनंदराव चव्हाण, प्रकाश रणधीर, विलास चव्हाण, विलास रोहमारे, केशव जावळे, सचिन होन, कौसर शेख, पंकज पुंगळ, गंगाधर औताडे, प्रमोद आभाळे, शंकरराव गुरसळ, भिवराव दहे, दौलतराव गुरसळ, बाबासाहेब होन, गंगाधर खोमणे, अनाजी पुंगळ, भाऊसाहेब होन, किशोर जावळे, कर्णा जाधव, सागर रोहमारे, महेंद्र वक्ते, किरण वक्ते, कांतीलाल लांडबले, कल्याण गुरसळ, बापूसाहेब वक्ते, विनोद रोहमारे, मयूर रोहमारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...