आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्वाही:पोलिसांच्या घरांसाठी अधिकचा निधी देणार, राज्यात आणखी 75 सुसज्ज पोलिस ठाणे उभारणार

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी ठाण्याच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार. - Divya Marathi
शिर्डी ठाण्याच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार.

पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीत दिली.शिर्डीतील पोलिस उपविभागीय कार्यालय, पोलिस ठाणे व अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या इमारतीचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, साई संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खा. सुजय विखे, आमदार किशोर दराडे, पोलिस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ पोलिस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. पोलिस गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. पुढील अधिवेशनात अधिकचा निधी देऊ. पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही व स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. पोलिस व इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवल्यास गुन्हे कमी होतील.

बातम्या आणखी आहेत...