आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Will Start 'pravara Pattern' Of Competitive Examinations; MLA Radhakrishna Vikhe's Announcement, Sahavichar Sabha Of Pravara Gramin Shikshan Sanstha | Marathi News

शैक्षणिक:स्पर्धा परिक्षांचा ‘प्रवरा पॅटर्न’ सुरू करणार; आमदार राधाकृष्ण विखे यांची घोषणा, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची सहविचार सभा

लोणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमीच नव्या बदलांचा स्वीकार करुन मार्गक्रमण केले आहे. येणाऱ्या काळात स्पर्धा परिक्षांचा प्रवरा पॅटर्न सुरु करणार आहे. संस्थेच्या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालये डिजीटल करू. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकेची उभारणी करू, अशी घोषणा आमदार राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सहविचार सभेत केली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची सहविचार सभा आमदार विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, नवनियुक्त संचालक निवृत्त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे, आण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, शांतीनाथ आहेर, दत्ता पाटील शिरसाठ, मच्छिंद्र पावडे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहीणी निघुते, अॅड.पोपटराव वाणी, किशोर नावंदर, डॉ.शिवानंद हिरेमठ, लिलावती सरोदे उपस्थित होते. यावेळी निवृत्त सेवकांचा कृतज्ञता सोहळा झाला.

आमदार विखे म्हणाले, प्रवरेत शिक्षण घेऊन बाहेर गेलेले विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. हीच खरी प्रवरेची उपलब्धी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३४ वर्षानंतर या देशाला नवे शैक्षणिक धोरण दिले. या धोरणात प्रत्येक व्यक्तिच्या क्षमतांचा विकास करण्याचा विकास अंतर्भूत केला आहे. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनी संस्थेच्या वाटचालीचा इतिहास विषद करुन, कोविड संकटातही संस्थेतील शिक्षक आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घेतलेल्या परिश्रमाचे कौतूक केले.

परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार
भविष्यात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस आपल्याकडे सुरु होणार आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करताना शिक्षणाचा दर्जा कायम राखताना स्वंयरोजगाराची निर्मिती शिक्षणातून कशी निर्माण होईल हा विचार कृतीत उतरवावा लागेल, असे आमदार विखे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...