आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ४ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सुमारे १६० इलेक्ट्रिक कचरा वाहतूक गाड्या खरेदीसाठी १३ मार्चपर्यंत जेईएम पोर्टलवर निविदा दाखल करण्याची मुदत होती. परंतु, प्रशासनाने अटी-शर्तीमध्ये ९ मार्चलाच स्पेसिफिकेशन तपासणीसाठी वाहनांचे नमूने सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अवघ्या तीन गाड्यांचे नमुने जिल्हा परिषदेसमोर सादर झाले. निविदेची मुदत संपण्यापूर्वीच घाईत गाड्या सादर करण्याचे निर्देश असल्याने संपूर्ण खरेदी प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी १४ व्या वित्त आयोगातील शिल्लक निधीतून तीन चाकी इलेक्ट्रिक कचरा वाहतूकयोग्य वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या निधीतून १६० वाहनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडील निधी असल्याने खरेदीप्रक्रिया जिल्हा परिषदेमार्फतच राबवली जात आहे.
या निविदा जीईएम पोर्टलवर मागवण्यात आली. निविदा सादर करण्याची मुदत १३ मार्च २०२३ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी साडेतीन वाजता निविदा उघडणार असल्याचे जेईएम पोर्टलवर स्पष्ट केले होते. ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे ही प्रक्रिया राबवत आहेत. या निविदा शासनाच्या जेईम पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अटी-शर्तीत क्रमांक आठमध्ये, वर्णनाप्रमाणे घंटागाडी ९ मार्चला यांत्रिकी उपअभियंत्यांसमोर सादर करण्याचे स्पष्ट केले. निविदा सादर करण्याची मुदत १३ मार्चला संपणार आहे, वाहने सादर करण्यासाठी तीन दिवस अगोदरची मुदत दिल्याने साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गुरुवारी केवळ तीन एजन्सी गाड्या सादर झाल्याचे दिसून आले.
मागणी आल्यास मुदतवाढ
गाड्यांचा नमुना सादर करण्यासाठी जर मागणी आली, तर आपण सँम्पल सादर करण्यासाठी मुदतवाढ देऊ शकतो. याबाबत मी संबंधित ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देणार आहे. - आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.