आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुपरमार्केट व किराणा दुकानात वाइन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करून त्यावर जनतेच्या हरकती, सूचना मागवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील जनतेचे मत जाणून घेतल्यानंतर किराणा दुकानातून वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी लेखी स्वरूपात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिली. या निर्णयासंदर्भात भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाच्या कार्यालयाकडून राज्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. सरकारच्या निर्णयाची माहिती हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेत दिली. उपोषण न करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरल्याने हजारे यांनी सोमवार १४ फेब्रुवारीपासून वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात उपोषण सुरू करण्याचा निर्णय स्थगित केला.
वाइन विक्रीच्या प्रस्तावावर जनतेच्या हरकती व सूचना मागवण्यात येणार असल्याने राज्यातील सुपरमार्केट व किराणा दुकानातून वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय आता जनतेच्या न्यायालयात गेला आहे.
वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २ व ५ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.हा निर्णय तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे नेणारा, असल्याचे हजारे यांनी म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.