आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाला माणूस म्हणून जगवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे, संतांचे आशीर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे काम हॉस्पिटलमध्ये हाेत आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. या हाॅस्पिटलच्या मानवरुपी ईश्वरसेवेला महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आनंदऋषिजी हॉस्पिटल मध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त रमेश बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, युवासेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शिवसेना शहरप्रमुख शंभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, पारुनाथ ढोकळे, शरद कोके, कुसुमबाई बोथरा, दीपक बोथरा, ज्योती बोथरा, अमृता बोथरा, रमेश बोथरा, अनिता बोथरा, संतोष बोथरा, बाबूशेठ लोढा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, डॉ. वसंत कटारिया, वसंत चोपडा, सुभाष मुनोत, डॉ. अमित थोपटे, डॉ. पियुष मराठे, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वसंत कटारिया यांनी केले. संतोष बोथरा म्हणाले, शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलसाठी नेहमी सहकार्य केले. रुग्णसेवेच्या या कार्यात त्यांचे योगदान राहिले आहे. संतांच्या आशीर्वादाने त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारून काम केल्याने त्याचे आजही शहरात नाव घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी कदम यांनी धकाधकीच्या जीवनात मैदाने ओस पडली आहेत. हॉस्पिटल भरली आहे.
समाज आरोग्यदायी करण्यासाठी व्यायामाकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. तर आनंदऋषीजी हॉस्पिटलचा बहरलेला वटवृक्ष सर्वांना आरोग्याची सावली देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश कवडे म्हणाले, आनंदऋषीजी महाराजांच्या कृपेने हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा सुरू आहे. तळागाळातील लोकांना याचा लाभ मिळत आहे. नगर-कल्याण रोडला उभे राहत असलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दुसऱ्या प्रकल्पाला सहकार्य राहील. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. या शिबिरात २२३ रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली.
जे इतरांसाठी जगतात तेच अजरामर होतात : फुलसौंदर
जगा आणि जगू द्या!, हे आनंदऋषीची महाराजांचे विचार घेऊन हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. माणसात देव पाहून रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. जे इतरांसाठी जगतात तेच अजरामर होतात. याच विचारधारेने शहरात स्व. अनिल राठोड यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा वसा शिवसेना पुढे चालवत आहे, असे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.