आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासामुळे भाजपने चार राज्यांत पुन्हा सत्ता राखली

कोपरगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे प्रतिपादन

भारतीय जनता पक्ष आणि देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकल्यामुळेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपने पुन्हा सत्तेचे कमळ राखले. ही २०२४ च्या लोकसभेच्या विजयाची नांदी आहे. देशाला वाचवणारे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच आहे. अजून कुणाच्या ही मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण झालेली नाही आणि होणारही नाही, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

विजयाचा आनंदोत्सव कोल्हे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहरातील मुख्य रस्त्यावर जनतेला लाडू आणि पेढ्यांचे वाटप केले.

कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात चार राज्यांतील निवडणुकीचा जल्लोष साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश भाजपचे रवींद्र बोरावके म्हणाले, भाजप आणि देशाचे नेतृत्व मोदी यांच्या विषयी विरोधी पक्ष बाष्कळ बडबड करत होते. त्यांना चार राज्यातील निवडणुकीत मोदींचा करिष्मा पाहायला मिळाला. आता त्यांची बोलती बंद होणार आहे. महाराष्ट्रात तीन पायाचे सरकार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. पण २०२४ ची विधानसभा ही भाजप मोठ्या नेतृत्वाने विजयी होईल.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला मोठी परंपरा आहे. येथे भरवश्याचे नेतृत्व आहे. काँग्रेस पक्षात ते दिसत नसल्याने त्यांची आज वाताहत झाली. गोवा राज्याचे प्रभारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा सोपान राखून पंतप्रधान मोदींसह सर्व राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ केला. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास व सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणीमुळे चार राज्य भाजपने पुन्हा काबीज केले. जनेतेच्या विश्वासाला भाजप आगामी काळात ही पात्र ठरेल. याप्रसंगी शहराध्यक्ष दत्ता काले, अविनाश पाठक, स्वप्नील निखाडे, मंगल आढाव, विजय आढाव, राहुल सूर्यवंशी, कैलास खैरे, जगदीश मोरे, हर्षदा कांबळे, विद्या सोनवणे, राजेंद्र सोनवणे, नरेंद्र डंबीर, शिल्पा रोहमारे, वैभव गिरमे, कानिफ गुंजाळ, दीपक जपे, रिपाइंचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर आदी उपस्थित होते. सुशांत खैरे यांनी सूत्रसंचालन केले.

कोपरगावात जनतेला लाडू व पेढे वाटून भाजपचा आनंदोत्सव

मोदी व योगींचा हा विजय
भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या विरोधात काही विरोधकांनी व पात्रता नसलेल्या बालिश बडबडीला जनतेने स्पष्टपणे नाकारले. त्यांच्या उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त केल्या. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने आनंदोत्सव आहे, असे भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...