आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:फेर आरक्षण सोडतीच्या शक्यतेने; इच्छुक उमेदवार धास्तावले

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत वाढवलेली गटसंख्या पूर्वीप्रमाणे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे गट पुन्हा एकदा ८५ वरून ७५ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरक्षण सोडतीनंतर स्वत:ची उमेदवारी पक्की समजणारे उतावीळांचीही फेर सोडतीच्या धास्तीने पंचाईत झाली आहे. ठाकरे सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांत किमान ५५ तर जास्तीत जास्त ८५ सदस्यसंख्या निश्चित केली.

त्यामुळे जिल्ह्यात २०१७ मध्ये झालेल्या गटरचनेच्या तुलनेत १२ नवे गट व २४ गणांची वाढ झाली. परंतु, शिंदे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यसंख्या पूर्वीप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्हा परिषदेतील गटाची संख्या जास्तीत जास्त ७५ ठेवता येणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या निर्णयानुसार काढण्यात आलेल्या ८५ गटांची आरक्षण सोडत रद्द होऊन नवीन निर्णयाप्रमाणे गटरचना होऊन फेर सोडत करावी लागणार आहे.

मागील आरक्षण सोडत ज्यांच्या पथ्थ्यावर पडली त्यांचा मात्र आता हिरमोड झाला आहे. तर ज्यांची गैरसोय झाली होती, त्यांच्यात मात्र नवचैतन्य संचारले आहे. x२०१२ च्या निवडणुकीवेळी जिल्ह्यात ७५ गट व १५० गण होते. त्यानंतर झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत गटांची संख्या कमी करून ७३ केली होती. त्यावेळी केलेल्या रचनेत काही गट कमी व काही नवीन निर्माण केले होते. आता २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा गट पूर्वीप्रमाणे केल्यास जिल्ह्यात २०१७ च्या रचनेप्रमाणे ७३ गट असतील. त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.

आरक्षण सोडतीकडे लक्ष
२०२२ साठी झालेल्या आरक्षण सोडतीत जि.प. माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या सोयीचे बेलपिंपळगाव सलाबतपूर गट राखीव झाले होते. तर कैलास वाकचौरे यांचीही अडचण झाली होती. परंतु फेरआरक्षण सोडतीच्या शक्यतेने यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर दुसरीकडे हराळ यांचा वाळकी, वांबोरी, कुळधरण या गटातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...