आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 अर्ज ठरले वैध:शहर बँक निवडणुकीत अर्ज माघारीस सुरुवात ; 11 डिसेंबरला होणार निवडणूक

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवलेल्या २८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.शहर सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी ११ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण जागेसाठी संजय घुले, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, अशोक कानडे, सुभाष गुंडेचा, डॉ. विजय भंडारी, जयंत येलुलकर, निखिल नहार, माणिक विधाते, गिरीश घैसास, भूषण अनभुले, दिलीप अडगटला, अनिस चुडीवाला, गणेश विद्ये, रवींद्र औटी, अनुसूचित जाती जमाती जागेसाठी प्रदीपकुमार जाधव, सारंग क्षेत्रे, मच्छिंद्रनाथ क्षेत्रे, रवींद्र राठोड तर महिला राखीव जागेसाठी स्वाती कांबळे, रेश्मा आठरे, नयना अडगटला, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी जागेसाठी संजय घुले, पराग डेरे, स्वप्नील घुले, भटक्या विमुक्त जाती जमाती जागेसाठी सुनील फळे, गणेश विद्ये या उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी घैसास गुंदेचा पॅनल कडून १५ जागांवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त १३ उमेदवारी अर्ज दाखल आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे २८ नोव्हेंबरला चिन्ह वाटप केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...