आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या बेलापुरातील विजयस्तंभाचे आकर्षक नूतनीकरण करण्यात आले असून बेलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीच्या साक्षीचे प्रतीक म्हणून नव्या पिढीला देशासाठी त्याग, समर्पण, एकता, देशभक्तीच्या आठवणी ताज्या करून देण्यासाठी नव्याने दिमाखात उभा आहे.
बेलापूर हे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचे केंद्र समजले जात होते. बेलापुरातील स्वर्गीय रामदयाळ नथमल दायमा, बस्तीराम राणेजा, रुपाशेठ श्रीगोड, फकिरचंद हबीराज बाठीया, रामचंद्र नथमल वर्मा, सावळेराम गोविंदराव उंडे, रामचंद्र राठोड, अण्णासाहेब लक्ष्मण डोखे, गोविंदराव काळे, केशवराव विष्णुपंत कुलकर्णी, गणेश गंगाधर काळे, खेवराज जसराज श्रीगोड, रुपचंद जसराज श्रीगोड, छगनलाल जसराज श्रीगोड, शिवदास जोशी, चुनीलाल ताथेड, डॉ. बिहारीलाल गंगवाल, बबतपुरी गोसावी, बाबुराव दगडू मुंडलिक, दगडू रोडे आदी स्वातंत्र्य संग्रामाचे लढवय्ये व शिलेदार स्वातंत्र्यसैनिक होते. १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. गावात मध्यरात्री जल्लोष करण्यात आला. १५ आॅगस्ट १९४७ रोजी सकाळी तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांचे उपस्थितीत तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रभात फेरीही काढण्यात आली होती. गेल्या ७५ वर्षांपासून आजतागायत बेलापूरला १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी सार्वजनिक ध्जवंदनाची परंपरा सुरू आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा ध्वजस्तंभ अस्तित्वात असावा. दरम्यान सन १९८७ चे सुमारास तत्कालीन सरपंच स्व. मुरलीशेठ यांनी विजयस्तंभाचे नुतणीकरण केले. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ग्रामपंचायतीचा शताब्दी महोत्सवानिमिंंत्त जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निधीतून सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुशोभीकरण केले. बेलापूरचे भूमिपुत्र पुणे येथील ख्यातनाम शिल्पकार प्रशांत विनायक बंगाळ यांचे अभिनव व विविध प्रतिकांचा वापर करून विजय स्तंभाचे सुशोभीकरण करीत आहेत. याचंे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.
भुईकोट किल्ल्याच्या धर्तीवर ठरली वेळ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भुईकोट किल्ल्यात आचार्य नरेंद्र देव हे स्थानबद्ध होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी किल्ल्यातील फत्तेपूर बुरुजावर सकाळी नऊ वाजता तिरंगा फडकावला. त्याचवेळी बेलापुरातील विजयस्तंभावरही तिरंगा फडकावला गेला. तीच वेळ आजही पाळली जात आहे. दरम्यान हा विजयस्तंभ श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील युवकांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान आहे.
झेंडा चौक ते विजयस्तंभ चौक येथे झेंडा फडकावला जायचा म्हणून पूर्वी या ठिकाणाला झेंडा चौक म्हटले जायचे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या आनंदात येथे तिरंगा फडकावला गेला आणि या चौकात आनंदोत्सव साजरा केला गेला म्हणून विजयस्तंभ चौक संबोधले जाऊ लागले. नवीन पिढीला या विजयस्तंभाची महती या सुशोभीकरण कामाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हे काम तत्परतेने पूर्ण केले गेले.
श्रीरामपूर शहरातील हाच तो विजयस्तंभ भुईकोट किल्ल्याच्या धर्तीवर ठरली वेळ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भुईकोट किल्ल्यात आचार्य नरेंद्र देव हे स्थानबद्ध होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी किल्ल्यातील फत्तेपूर बुरुजावर सकाळी नऊ वाजता तिरंगा फडकावला. त्याचवेळी बेलापुरातील विजयस्तंभावरही तिरंगा फडकावला गेला. तीच वेळ आजही पाळली जात आहे. दरम्यान हा विजयस्तंभ श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील युवकांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.