आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:स्कूलबस-दुचाकीच्या अपघातात महिला ठार; पोलिसात गुन्हा दाखल

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कुल बस व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात कौसाबाई संतु बोडके (वय ६५) या जागीच ठार झाल्या तर संतु बाबुराव बोडके (वय ७५, वडजिरे, तालुका सिन्नर) हे गंभीर जखमी झाले. नाशिक-पुणे महामार्गावर नांदूर-शिंगोटे येथील निमोण चौफुलीवर दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

बोडके दांपत्य नांदूर शिंगोटे येथील नातेवाईकाचे लग्न आटाेपून घराकडे निघाले होते. संगमनेर येथील डेरे इंग्लिश स्कुल बस (एमएच १७, एजी ६५६८) हिने चौफुलीवरून वळण घेणाऱ्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ३९७७) पाठीमागून धडक दिली. या अपघातात कौसाबाई बोडके जागीच ठार झाल्या. अपघात होताच स्कुल बस चालक फरार झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी संतू बोडके यांना दोडी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले. संतप्त जमावाने स्कुल बस पेटवून देण्याचा प्रयन्त केला, मात्र सिन्नर महामार्ग पोलिस केंद्राचे उपनिरीक्षक राजकुमार शालम तडवी, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील गायकवाड, अंमलदार राहुल पगारे, हरिश पवार, समाधान शिंदे वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टाळला. यावेळी वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. फरार चालकाचे नाव अद्याप निष्पन्न झाले नाही, मात्र वावी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...