आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्‍त:मुल्ला कटर कडून मुलीला विकत घेणारी महिला अटकेत

श्रीरामपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर येथील गुन्हेगार मुल्ला कटर याच्याकडून एका मुलीस विकत घेऊन देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेस शेवगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. एका अठरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणे,मुलीचे अपहरण करून गाडीत बसून तिला पांढरीपुल येथे नेऊन बाबा चेंडवाल याला विकणे, तेथे तिच्याकडून देहविक्री करून घेणे व शेवगाव येथे देखील तिच्याकडून देहविक्री करून घेणे प्रकरणी यापूर्वीच मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर,पप्पू /प्रशांत गोरे,बाबा चेंडवाल व एक महिला आणि तिचा भाऊ यांच्या विरोधात पोक्सो कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील मिनाबाई रुपचंद मुसावत या महिलेला शेवगाव येथून पोलिसांनी अटक केली. तिला न्यायल्याचात हजर केले असता २७ पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक मिटके यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...