आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:महिलांनी जगाला दिला सक्षम नेतृत्वाचा परिचय‎

नगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सर्वच क्षेत्रांत महिलांनी सक्षम‎ नेतृत्व व कार्य कुशलतेचा परिचय‎ जगाला करून दिला आहे. विविध‎ क्रीडा क्षेत्रांमध्ये अनेक पदके‎ महिलांनी मिळवून दिली आहेत.‎ अनेक कला क्षेत्रांमध्ये महिलांनी‎ मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्या‎ क्षेत्राचा लौकिक वाढविला आहे,‎ असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे‎ माजी उपसचिव तथा आर्मर्ड कोअर‎ व मॅकेनाईज इन्फंट्रीचे वित्तीय‎ सल्लागार आणि अपर नियंत्रक डॉ.‎ महेश दळे यांनी केले.‎ रक्षा लेखा विभागाच्या येथील वेतन‎ लेखा कार्यालय (आर्मर्ड कोर)‎ आणि वेतन लेखा कार्यालय‎ (मेकॅनाईज्ड इन्फंट्री) या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यालयांमध्ये जागतिक महिला‎ दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ त्याचा समारोप बुधवारी (ता. ८)‎ झाला. त्यावेळी डॉ. दळे बोलत होते.

‎ मुख्य अतिथी म्हणून न्यायमूर्ती चारु‎ डोंगरे उपस्थित होत्या. त्यांनी‎ महिलांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले. जागतिक महिला दिनाची‎ पार्श्वभूमी सांगताना, न्यूयॉर्कमधील‎ घटनेपासून आतापर्यंतच्या‎ महिलांच्या विविध क्षेत्रातील‎ कार्याचा आढावा घेतला. स्री-पुरुष‎ समानता ही सर्वच पातळीवर कशी‎ यशस्वीपणे प्रत्यक्षात येऊ शकते,‎ याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लेखा अधिकारी अर्चना‎ सोनवणे, सुरेखा शिंदे, उल्का‎ क्षीरसागर कार्यालयातील इतर‎ अधिकारी-कर्मचारी, तसेच‎ सेवानिवृत्त महिला कर्मचारी यावेळी‎ उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन उदय कुलकर्णी यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...