आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:महिलांना हक्काची जाणीव‎ असली पाहिजे : नगरकर‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संविधानाने महिलांना‎ समानतेचा हक्क दिलेला आहे.‎ महिलांना आपल्या हक्काची जाणीव‎ असली पाहिजे. त्यासाठी महिला‎ सबलीकरण अभियान राबविले जात‎ असल्याचे प्रतिपादन अहमदनगर‎ न्यायालयातील अ‍ॅड. स्वाती नगरकर‎ यांनी केले.‎ आजीवन अध्ययन व विस्तार‎ विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‎ व रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे‎ महिला महाविद्यालय, अहमदनगर‎ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजीवन‎ अध्ययन व विस्तार कार्यक्रमा’अंतर्गत‎ ‘महिला सबलीकरण’ विषयावर‎ आयोजित व्याख्यानात त्या बोलत‎ होत्या.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. शंकर थोपटे होते.‎ अनेक कर्तृत्ववान महिलांचा‎ उल्लेख करताना, शारीरिक शिक्षण‎ संचालिका डॉ. मनीषा पुंडे म्हणाल्या,‎ की शारीरिक, मानसिक,‎ बौध्दीकदृष्ट्या महिला सक्षम‎ असतील, तर त्या जीवनातील विविध‎ क्षेत्रात यश संपादन करू शकतात.‎ स्त्रियांमध्ये आत्मविश्वास व साहस‎ निर्माण करणे, हेच महिला‎ सबलीकरणाचे उद्दिष्ट आहे.‎ प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत देसाई यांनी‎ केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी ठुबे‎ यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ डॉ. भास्कर निफाडे, डॉ. आंबेकर, प्रा.‎ इंदापुरे, महाविद्यालयातील विद्यार्थिनी‎ व अध्यापक वर्ग मोठ्या संख्येने‎ उपस्थित होता. डॉ. अंजली खिलारी‎ यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...