आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:महिलांनी वृक्षारोपणाची‎ लोकचळवळ उभारावी

नगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎नगर शहरातील महिलांनी सकारात्मक‎ दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत‎ स्वच्छता, वृक्षरोपण व संवर्धनाची‎ लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन‎ उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.‎ जागतिक महिला दिनानिमित्त उपमहापौर‎ गणेश भोसले यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १४‎ मधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान‎ करण्यात आला.

यावेळी महिला‎ बालकल्याण समितीच्या उपसभापती मीना‎ चोपडा, संगीता भोसले, मनीषा भागानगरे,‎ नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा‎ आदी उपस्थित होते.‎ उपमहापौर भोसले यांच्या वतीने प्रभाग‎ क्रमांक १४ मधील कर्तृत्ववान महिलांचा‎ सन्मान करण्यात आला. महिलांसाठी‎ सांस्कृतिक व विविध स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते. त्यातील विजेत्या‎ महिलांना सोन्याची नथ, पैठणी आदींसह‎ विविध पारितोषिके देण्यात आली. त्यात‎ विजेता शुभांगी कुनाळे, स्नेहल भोसले,‎ कविता मदने, कल्पना कटारिया, सेजल वाघ,‎ अरुणा तुरे, आशा भांड, उषा साळवे आदींनी‎ बक्षिसे मिळवली.‎ ‎

बातम्या आणखी आहेत...