आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध जबाबदाऱ्या सांभाळताना, महिलेचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्याधींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आहार आणि व्यायामाबरोबरच नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्मिता पटारे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भिंगार येथील श्री दंतेश्वरी माता महिला मंडळ व श्रीराम भजनी मंडळ, हलबा समाज यांच्या वतीने चौंडेश्वरी मंदिर, सरपण गल्ली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फिनिक्स फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित शिबिरात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्मिता पटारे यांनी महिलांची नेत्रतपासणी केली. याप्रसंगी जालिंदर बोरुडे, डॉ. भावना शेळके उपस्थित होते.
याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, की वाढत्या आरोग्य खर्चामुळे अनेकजण आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात, त्याचे दुष्परिणाम भविष्यात मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. त्यासाठी वेळीच उपचार होणे गरजेचे असते. आज महिला मंडळाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या माध्यमातून महिलांची तपासणी झाल्याने खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला. श्रीराम भजनी मंडळाच्या प्रमुख डॉ. भावना शेळके यांनी महिलांना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची व महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची, याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता पटारे आय क्लिनिक व फिनिक्स फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबीरात १४७ महिलांची नेत्रतपासणी करण्यात आली. श्रीराम भजनी मंडळ व श्री दंतेश्वरी माता महिला मंडळ हलबा समाज भिंगार या दोन्ही ग्रुपच्या महिलांनी या कार्यक्रमासाठी आठ दिवस अतिशय परिश्रम घेऊन या कार्यक्रमाची तयारी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.