आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये महिला बचत गट मेळावा:महिलांनी आलेल्या संधीच सोनं करून स्वतःला सिद्ध करावं - सुनंदा पवार

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
घारगाव येथे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात मार्गदर्शन करताना बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार. - Divya Marathi
घारगाव येथे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात मार्गदर्शन करताना बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार.

महिलांना आज बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या संधीच सोनं करून महिलांना स्वत:ला सिद्ध करावं. त्या वेळी महिला खऱ्या अर्थाने सक्षम होतील, असे प्रतिपादन बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती

राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान उमेद अंतर्गत घरगुती व्यवसाय करणाऱ्या आणि बचत गटातील सभासद महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना व्यवसाय मार्गदर्शन यासाठी बचत गटातील महिलांचा मेळावा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष संगीता खामकर यांच्या पुढाकाराने घारगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काय म्हणाल्या सुंनदा पवार?

सुनंदा पवार म्हणाल्या, महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतः च्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. महिलांनी स्वतः चा सन्मान आधी करायला शिकावं, तरच समाजात आपली मान उंचावेल. तसेच महिला बचत गटांनी पुण्यात होणाऱ्या भीमथडी जत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले. प्रभाग समन्वय रोहिणी जगताप यांनी महिलांनी मिळालेल्या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लोहार यांनी व्यवसाय आणि त्यासाठी शासनाच्या कर्ज योजना त्यावर मिळणारी सबसिडी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी सरपंच अरुणा खोमणे, प्रभाग समन्वयक रोहिणी जगताप, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर, अनिता रायकर, अनिता काळे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...