आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादंडकारण्य अभियान संगमनेर तालुक्याची ओळख आहे. यामुळे डोंगराळ भाग हिरवागार दिसतो आहे. वटपौर्णिमा महिलांचा महत्वपूर्ण उत्सव आहे. वटवृक्ष देव वृक्ष असून त्याला आयुष्य जास्त असते. ऑक्सीजन देणाऱ्या या वृक्षाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनात महिलांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा. तालुका समृद्ध व हिरवाईचा करण्यासाठी काम करा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात यांनी केले. दंडकारण्य अभियानातंर्गत वटपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खांडगावच्या कपालेश्वर मंदिर येथे आयोजित वृक्षारोपण व वटपूजन कार्यक्रमात थोरात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी दुर्गा तांबे होत्या. डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, अर्चना बालोडे, राधाबाई गुंजाळ, उपसरपंच लक्ष्मीबाई गुंजाळ, अर्चना सराफ, रमेश गुंजाळ, अॅड. मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, प्रा. बाबा खरात, गणेश सराफ, वनक्षेत्रपाल सचिन लोंढे, समन्वयक बाळासाहेब उंबरकर उपस्थित होते. उपस्थित महिलांनी वटवृक्षाचे रोपण व पूजा केली. तर तालुक्यात १ हजार १११ वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी सावित्रीच्या लेकी सरसावल्या होत्या.तांबे म्हणाल्या, वाढत्या तापमानावर अंकुश ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा प्रभावी उपाय आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या सप्तमंत्राची शपथ गावची स्वच्छता, गावच्या शाळेची जपवणूक, प्रत्येक मुलाचे शिक्षण, व्यसनमुक्त गाव, वृक्षरोपण व संवर्धन, मुलगा-मुलगी समानता, मानवताधर्म या पर्यावरण संवर्धनाच्या सप्तमंत्राची डॉ. जयश्री थोरात यांनी वटपौर्णिमेनिमित्त महिलांना शपथ दिली. दरम्यान तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वटपूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.