आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:पाणी व ड्रेनेजप्रश्नी मनपाच्या उपायुक्तांना महिलांचा घेराव; उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कायनेटिक चौक रेल्वे स्टेशन परिसरातील अचानक वस्ती रोहिदास वाडी व गौतमनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी व ड्रेनेजच्या समस्येबाबत मनपा उपायुक्तांना घेराव घालून जाब विचारला. समस्या न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. गौतम नगर, अचानक वस्ती व रोहिदास वाडी हा भाग प्रभाग १५ व १७ सीमारेषेवर आहे.

परिसरातील महिलांनी निलेश बांगरे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्तांना घेराव घालून जाब विचारला. तेथील समस्या उपायुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणल्या. उपायुक्त डांगे यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कुटी अम्मा, रसी अम्मा, मंगल गायकवाड, लंगोटे, घोलप, साबळे, सोनवणे, वैराळ, लांडगे आदी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...