आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाजियाबाद येथे खेला इंडिया राष्ट्रीय रँकिंग महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील आव्हाड महाविद्यालाची विद्यार्थी योगिता खेडकरने 87 किलो ज्युनियर वजन गटात 183 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
योगिताने मागील वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने केलेला 174 किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नुकतीच तिची स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया, बेंगलोर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. कोमल वाकळे हिने 87 किलो सिनियर वजन गटात 211 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते.
कोमल बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून ती बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वेटलिफ्टिंग सेंटरमध्ये सराव करते. या दोघींना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव प्रा. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले. या दोघींवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
खेलो इंडिया ही देशातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे म्हणून विविध राज्यांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची पात्रता बाळगून आहेत की नाही, असतील तर त्यांची काळजी कशी घेता येईल, त्यांच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जाईल, त्या प्रगतीची नोंद कशी ठेवता येईल हे काटेकोरपणे पाहिले जाते.
केंद्र सरकारच्या वतीने या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंना शिष्यवृत्तीच्या रूपात पैसे दिले जातात. पण केवळ पैसे दिल्याने सगळे प्रश्न सुटतात असे अजिबात नाही. हे खेळाडू या पैशांचा कसा विनियोग करत आहेत, हे पाहायला हवे. हे सरकारचे जसे काम असेल तसेच पालक आणि खेळाडूंच्या प्रशिक्षकांचेही काम असेल. सरकारने या शिष्यवृत्तीप्राप्त खेळाडूंची अद्यावत माहिती ठेवून त्यांच्या प्रगतीचा आलेख नियमितपणे तपासायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.