आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्रामीण आरोग्य केंद्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी आरोग्य मंदिरे होण्यासाठी काम करा, असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
तालुक्यातील जवळेकडलग व तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. थोरात यांनी भेट देत आरोग्य, अंगणवाडी, आशा सेविका व नर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, पं. स. सदस्य विष्णु रहाटळ, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच निलेश कडलग उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या, कोरोनामुळे प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व समजले आहे. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे प्रत्येकाने लक्ष व वेळ दिला पाहिजे. कुटुंबासाठी महिलांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. आरोग्य, अंगणवाडी व आशा सेविकांनी कोरोनात उत्कृष्ट काम केले. प्रत्येक कुटुंब निरोगी व सुदृढ बनवण्यासाठी मिशन निरोगी कुटुंब अंतर्गत काम करावे.
मंत्री थोरात यांनी आरोग्य केंद्रांसाठी मोठा निधी दिला असल्याने नागरिकांना चांगली सेवा द्या, असे आवाहन त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले. मंत्री थोरात यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर विकास योजना राबवल्या जात आहे. महिलांमध्ये आरोग्याची जागृती करण्यासाठी आरोग्य व अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घ्यावा, असे इंद्रजित थोरात म्हणाले. आरोग्याबाबत नागरिकांमध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा आहे. यासाठी अधिक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे गोडगे यांनी सांगितले. आभारसरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.